पुणे – ग्राहकांच्या सोयीसाठी सध्याच्या काळात सरकारी बँका खाजगी बँका देखील लोन ऑफर करत आहेत या योजनेचा आणि ग्राहकांना मोठा फायदा होतो. श्यामराव विठ्ठल को ऑपरेटिव्ह बँकेने (एसव्हीसी) फेस्टिव्हल लोन लाँच केले आहे. या अंतर्गत गृहकर्ज, सुवर्ण कर्ज आणि डॉक्टरांसाठी कर्जे आकर्षक दरात उपलब्ध करून दिली जात आहेत. यासोबतच बँक किमान ६.४५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे.
एसव्हीसी बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘एसव्हीसी महा लोन उत्सव’ अंतर्गत ग्राहक कर्ज आकर्षक दरात ऑफर करण्यात येत असून 11 राज्यांमधील बँकेच्या सर्व 198 शाखांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत कर्ज उपलब्ध असेल. बँकेने भारतीय लष्करासोबत सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे यामध्ये बँकमार्फत आपल्या डिफेन्स सॅलरी पॅकेज (DSP) योजनेंतर्गत सर्व सेवारत आणि सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना खास योजनेत फायदे देण्यात येत आहे.
बँकेने या निवेदनात म्हटले आहे की, सामंजस्य करारांतर्गत, बँक मोफत वैयक्तिक आणि हवाई अपघात विमा (मृत्यू) कव्हर, कर्तव्याच्या ओळीत मृत्यू झाल्यास अतिरिक्त कव्हर आणि कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व किंवाआंशिक अपंगत्व कव्हर ऑफर करते. या योजनेंतर्गत लष्करातील जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठीही मदत दिली जाते.