विशेष प्रतिनिधी, मुंबई
साधारणतः प्रत्येक नागरिकाचे कोणत्यातरी बँकेत बचत खाते असते, गरज लागेल तेव्हा या बचत खात्यातून नागरीक पैसे काढतात, किंवा शक्यतो बचत खात्यात करण्यासाठी पैसे टाकतात. शासकीय तसेच खासगी बँका या बचत खात्यांवर ग्राहकांना व्याज देतात, परंतु हे व्याज दर महिन्याला मिळत नाही, मात्र आता एका खासगी बँकेने दर महिन्याला ग्राहकांना व्याज देण्याचे ठरविले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या नियमांनुसार बँका ठेवीदारांच्या खात्यावर तिमाही व्याज टाकतात. परंतु आयडीएफसी फर्स्ट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या बँकेने आपल्या सर्व बचत बँक खात्यावर मासिक व्याज सुविधा सुरू केली आहे. म्हणजे आता ग्राहकांना बचत बँक खात्यावर दरमहा व्याज रक्कम मिळेल. आतापर्यंत ग्राहकांना अनेक महिने थांबावे लागत होते . तथापि, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे नवीन नियम १ जुलैपासून लागू आहेत.
आरबीआय च्या नियमांनुसार बँका ठेवीदारांच्या खात्यावर तिमाही व्याज पाठवतात. तथापि, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मासिक आधारावर क्रेडिट करण्यास तयारी केली आहेत. यासंदर्भात आरबीआयकडून कोणतीही सक्ती केलेली नाही. आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यावर वर्षाकाठी तीन ते पाच टक्के व्याज देते. व्याजाचा दर रकमेच्या आधारे लागू आहे.
बँक ग्राहकांच्या जर बचत खात्यात १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असेल तर ४ टक्के दराने व्याज मिळू शकेल. त्याचबरोबर, एक लाखापेक्षा जास्त आणि १० लाखांपेक्षा कमी रकमेवर वर्षाकाठी ४.५० टक्के व्याज दिले जाते. खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या एकूण ग्राहक ठेवींमध्ये ३५.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० जून रोजी ही ठेव ६२ हजार ४०९ कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून ८४ हजार ५८३ कोटी रुपये झाली आहेत.