नवी दिल्ली -कोविड-19 च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सातत्याने बहुस्तरीय आरोग्य यंत्रणा आणि चाचणीच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक बळकट करत आहे. आणि राज्यांशी समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उपाययोजनांवर भर देत आहे. कोविड-19 च्या आजवरच्या प्रवासातील महत्वाच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी राज्य सरकारांना आवश्यक त्या सूचना देत, संकटांचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे.
इन्साकॉग ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिंतेचा विषय ठरलेल्या या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-
-
संक्रमणक्षमतेत वाढ
-
फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता
-
मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता