इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
अलीकडच्या काळात अनेक शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात येते, परंतु झारखंडमध्ये पोस्ट तथा टपाल खात्यातील दोघांना बेहीशोबी जमवल्या प्रकरणी अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सीबीआयने धनबाद जिल्हयातील गिरिडीहच्या दोन वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये तैनात असलेल्या अल्ताफ आणि कृष्ण कुमार दास दोन कर्मचार्यांवर बेहिशोबी मालमत्ता मिळवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गिरिडीह पोस्ट ऑफिस घोटाळ्यात चर्चेत असलेले यांच्याविरुद्ध स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
याबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, १ मार्च २०१४ ते २१ डिसेंबर २०१९ दरम्यान अल्ताफचे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील गोळा केला. या कालावधीत अल्ताफच्या उत्पन्नापेक्षा त्याची मालमत्ता ६१ लाख दोन हजार ८४४ रुपये अधिक असल्याचे तपासा दरम्यान आढळून आले. अल्ताफ हा मधुपूर सब पोस्ट ऑफिस, गिरीडीह आणि गिरिडीह हेड पोस्ट ऑफिसमध्ये काम करत आहे. त्याचप्रमाणे सीबीआयने १ जानेवारी २०१५ ते २४ऑगस्ट २०२१ या कालावधीत गिरिडीह सब पोस्ट ऑफिस आणि हेड पोस्ट ऑफिसमध्ये तैनात असलेल्या कृष्ण कुमार दास यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चौकशी केली. या तपासात कृष्णकुमार ६५ लाख ७७ हजार ५६६ रुपयांच्या उत्पन्नाचा योग्य हिशोब मिळू शकला नाही. त्यामुळे ती बेहिशोबी समजण्यात आली.
दरम्यान, सीबीआयने अल्ताफविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले होते. गिरिडीह पोस्ट ऑफिसमध्ये ८९ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अल्ताफ आणि कृष्णा क्रिमार दास यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोन्ही पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तीन खातेदारांच्या संगनमताने गुन्हेगारी कट रचून त्यांना ८८ लाख ६३ हजार ७८१ हजार रुपये हडप केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी सीबीआयने निलंबित असिस्टंट पोस्टमास्टर अल्ताफ आणि गिरिडीह हेड पोस्ट ऑफिसचे शशी भूषण कुमार, सब पोस्ट मास्टर बासुदेव दास आणि पवन कुमार सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.