विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात तीस मिनिटांची वैयक्तिक भेट झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनीच माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांना भेटणे यात गैर काय ? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नाते तुटले असा होत नाही.
मंगळवारी मराठा आरक्षणासह राज्यातील १२ प्रश्नांबाबत ही भेट शिष्टमंडळासह होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोबत होते. या शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांनी एक तास चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सोबत ३० मिनिट वैयक्तिक चर्चा केली. त्यामुळे या चर्चेला उधान आले आहे.
भेटी अगोदरच शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेट दरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, मुख्यमंत्र्यांनीच ही भेट झाल्याचे सांगत त्यात गैर नसल्याचे सांगितले. पण, या भेटीकडे राजकीय नजरेने बघितले जात आहे. शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतर ठाकरे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे ते भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर युती करावी अशी चर्चा झाली का असे इतर राजकीय पक्षांना वाटत असल्यामुळे ही चर्चा इतर प्रश्नांपेक्षा जास्त रंगली आहे.
बिहारमध्ये भाजपपासून दूर गेलेली मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा भाजपबरोबर आले. त्यामुळे महाराष्ट्रात असा प्रयत्न होत नाही नाही ना ? असे अंदाजही व्यक्त केले जात आहे. दरम्यान ठाकरे – मोदी भेटीमुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडीला वेग आला आहे.
https://twitter.com/micnewdelhi/status/1402164992258940934?s=20