अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीला येणारे दूरचे शेतकरी अनेक मुक्कामाला थांबतात आसपास कोणी नसल्याचा फायदा घेत दोघा चोरट्यानी एका ट्रॅक्टर मधून डिझेलची चोरी केली आहे. चोरी करणारे तालुक्यातील दरेगाव येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर असून बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांनी समक्ष चोरी करतांना पकडले. याबाबत बाजार समितीस बऱ्याच शेतकऱ्यांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्याने सदर आरोपी गणु उर्फ़ उमेश सुनील आहिरे ,राजेंद्र मोठभाऊ सोनवणे, अजित संजय पवार, ऋतिक कैलास पवार रा.दरेगाव ता.बागलाण येथील आहेत. यांच्यावर सटाणा पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी ही असे प्रकार घडले आहेत. जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळतो तेव्हा सटाणा बाजार समितीमधून कांद्याने भरलेल वहांन चोरी गेल्याची समोर आले आहेत. पूर्वीचे अनुभव पाहता कांदा उत्पादक संघटनेने बाजार समित्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पणन विभागाकडे आग्रही मागणी केली होती. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे तर बसवले.