मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओमिक्रॉन या कोरोनाच्या अवताराचे नवेनवे लक्षणे समोर येत आहेत. ही लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग श्वासन यंत्रणेसह पोटालाही प्रभावित करू शकतो. समजा तुम्हाला ताप, उल्टी, मळमळ आणि पोटदुखीसारखी समस्या निर्माण झाली असेल तर ही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याची लक्षणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याशिवाय श्वसनासंबंधित लक्षणे, पोटाची समस्या असेल तर कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे.
पोट खराब
नव्या स्ट्रेनमध्ये बहुतांश रुग्णांना पोट खराब होण्याची समस्या आढळून येत आहे. कोरोनाविरोधी लशीचे पूर्ण डोस घेतलेल्या नागरिकांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाच्या काही नव्या लक्षणांमध्ये मळमळ, पोटदुखी, उलटी, भूख न लागणे आणि अतिसार यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. गुरुग्राममधील फोर्टिस ममोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनोज गोयल सांगतात, काही नागरिकांमध्ये सुरुवातीला विनासर्दी-पडसे फक्त पोटात समस्या निर्माण होऊ शकते. त्यामध्ये पाठ, पोटदुखी, मळमळ, उलटी, भूक न लागणे आणि अतिसार यासारख्या लक्षणांचा समावेश आहे.
पोटावर सूज
ओमिक्रॉनमुळे पोटाच्या वरील पातळ कवचावर म्युकोसाचे संक्रमण होते. त्यामुळे सूज येऊ शकते. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना पोटाशी संबंधित या समस्या उद्भवू लागल्या आहेत. ही लक्षणे गंभीर नसून, घाबरून जाण्याची गरज नसल्याचे डॉक्टर सांगतात.
यापासून लांब रहा
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोटदुखी, मळमळ आणि भूख न लागणे ही लक्षणे दिसल्यास सामान्य संसर्गासारखे त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यात ही लक्षणे दिसून आली तर स्वतः विलगकीकरणात जावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. स्वतःला उत्साही ठेवा. हलके अन्न खावे आणि पूर्ण झोप घ्यावी. यादरम्यान मसालेदार अन्न आणि दारूपासून लांब राहा. सौम्य लक्षणे असल्यावर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.
इकडे लक्ष द्या
– ओमिक्रॉनने संक्रमित रुग्णांच्या स्वच्छतेवर पूर्ण लक्ष ठेवले पाहिजे.
– बाधितांना एकदम ताजे अन्न द्यावे.
– घरातील इतर सदस्यांसोबत जेवण शेअर करू नये.
– जेवण घेण्यापूर्वी सर्व फळांना चांगल्या प्रकारे धुवून काढा.
– लशीचे पूर्ण डोस घेतले असले तरी कोविड प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे.
– विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या खोलीतून बाहेर या.