विशेष प्रतिनिधी, मुंबई
व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद रंगला होता. मात्र त्याचा सर्वात मोठा फायदा टेलीग्राम या नवीन मेसेजिंग अॅपला झाला. कारण व्हॉट्सअॅप वापरणारे मोठ्या संख्येने टेलिग्रामकडे वळाले . त्यामुळे टेलीग्राम देखील आपल्या मोबाईल फिचर्स अॅप वापरकर्त्या ग्राहकांसाठी नवनवीन वैशिष्ट्ये आणतच आहे. नवीनतम ऑपडेटसमध्ये या कंपनीने ग्रुप व्हिडिओ कॉलिंगपासून स्क्रीन सामायिकरण पर्यंत अनेक वैशिष्ट्ये जोडली आहेत, आता टेलीग्रामच्या नवीन सुविधा व वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊ या…
ग्रुप व्हिडिओ कॉल आणि स्क्रीन शेअरींग : मोबाईल अॅप वापरकर्ते ‘माझा व्हिडिओ शेअर करा’ पर्यायावर टॅप करुन कोणत्याही सक्रिय सत्रामध्ये (एक्टिव्ह सेशन ) ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच व्हॉइस चॅटमध्ये सहभागी होण्यासाठी हे वैशिष्ट्य सध्या पहिल्या ३० लोकांना उपलब्ध आहे. तसेच टेलीग्रामने असा दावा केला आहे की, यामुळे लवकरच ग्रुप व्हिडिओ कॉल मर्यादा वाढविण्यात येईल. व्हिडिओ कॉल दरम्यान आपण आपली स्क्रीन देखील शेअरींग करू शकता. मेनू बटणावर टॅप करून स्क्रीन-शेअरींग वैशिष्ट्यावर प्रवेश केला जाऊ शकतो.
टॅब्लेट आणि डेस्कटॉप सपोर्ट : टेलिग्रामने टॅब्लेट आणि डेस्कटॉपसाठी देखील सपोर्ट जोडला आहे. टेलिग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, अॅप वापरकर्त्यांना साइड पॅनेल उघडण्यासाठी फक्त टॅप करावे लागेल, जे त्यांना व्हिडिओ ग्रीडचे स्प्लिट-स्क्रीन दृश्य आणि सहभागींची यादी देईल. डेस्कटॉपवर व्हॉइस चॅट वेगळ्या विंडोमध्ये उघडेल, अॅप वापरकर्ते काहीही मिनी माईज न करता टाइप करू शकतात आणि बोलू शकतात.
अॅनिमेटेड बॅकग्राऊंड : टेलीग्रामने आपल्या अॅपवर अॅनिमेटेड बॅकग्राऊंड देखील सादर केली आहे. या मेसेजिंग अॅपने म्हटले आहे की, अॅपमधील मल्टी कलर ग्रेडियंट वॉलपेपर वेगळया प्रकारे डिझाइन केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मेसेज पाठविल्यावर अॅनिमेट होते. अॅण्ड रॉईडवर या वैशिष्ट्यावर प्रवेश करण्यासाठी, चॅट सेटिंग्ज वर जाऊन चॅट बॅकग्राउंड चेंज वर टॅप करा.
टेलिग्रामची सुरक्षा वैशिष्ट्ये: टेलीग्रामने आपल्या अॅपवर अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये देखील सादर केली आहेत. कंपनीने लॉगिन इन्फो स्मरणपत्रे नावाचे एक वैशिष्ट्य सादर केले आहे. त्यामुळे वापरकर्त्याचा फोन नंबर टेलीग्रामवर अॅपडेट राहतो. तसेच अॅप वापरकर्ता नेहमीच त्याच्या खात्यात लॉग इन करण्यास सक्षम असतो. कदाचित फोन नंबर बदलला असेल तरी वापरकर्ते ते आयओएसवर सेटिंग्ज मधील नवीन स्मरणपत्रासह त्वरित अॅपडेट करू शकतात.