नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समलैंगिक संबंध असणे ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही, सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी असे संबंध असणे ही आश्चर्यकारक गोष्ट मानली जात असे विशेष म्हणजे भारतीय समाजात याला परवानगी नव्हतीच, या उलट त्याचा तिरस्कार केला जात होता. परंतु अलीकडच्या काळात अन्य देशांत प्रमाणेच भारतात देखील समलैंगिक संबंधांना काही प्रमाणात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अनेक जण असे संबंध असल्याचे जाहीर करतात यामध्ये आता काही खेळाडूंचा समावेश होत आहे. दुती चंद ही पहिली भारतीय खेळाडू आहे ज्यांनी समलिंगी संबंध असल्याचे कबूल केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती दुती तिच्या गावातील एका मुलीसोबत समलैंगिक संबंधात आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डे वर, दुती चंद आणि तिची जोडीदार मोनालिसा एका स्थानिक ओडिया-भाषेच्या मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार आहेत.
दुती चंद आणि मोनालिसा
एका रिपोर्ट्सनुसार, दुती चंद ही मोनालिसाला तिच्या गावात एका पूजेदरम्यान भेटली, यानंतर दोघेही फोनवर एकमेकांशी बोलू लागले. एकमेकांना ओळखल्यानंतर वर्षभरानंतर दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. भारताचा धावपटू दुती चंदला मोनालिसासोबत सेटल व्हायचे आहे. तथापि, दुती ही पहिली खेळाडू नाही जिने समलिंगी जोडीदाराला तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून निवडले आहे. सामाजिक बहिष्कारापेक्षा प्रेमाला प्राधान्य देणाऱ्या, समलैंगिक संबंध असलेल्या इतर क्रीडा व्यक्तिमत्त्वांबाबत जाणून घेऊ या.
ऑर्लॅंडो क्रूझ आणि जोस मॅन्युएल कोलोन
पोर्तो रिकन व्यावसायिक बॉक्सर ऑर्लॅंडो क्रूझने 2012 मध्ये समलिंगी संबंधात असल्याचे कबूल केले. फेदरवेट बॉक्सर ऑर्लॅंडो क्रूझने त्याचा दीर्घकाळचा प्रियकर जोस मॅन्युएल कोलनला फेसबुक पेजवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे प्रपोज केले. ऑर्लॅंडो क्रूझने नंतर जोस मॅन्युएल कोलनशी लग्न केले.
बिली जीन किंग आणि इलाना क्लॉज
अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंगने 1965 मध्ये ब्रिज प्लेयर लॅरी किंगशी लग्न केले. तथापि, बिली जीन आणि लॅरी किंग यांचा 1987 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर बिली जीन किंगने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या इलाना क्लॉसशी लग्न केले. माजी टेनिसपटू इलाना महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. त्याचवेळी बिली जीन किंगने तिच्या कारकिर्दीत 39 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली.
जेसन कॉलिन्स आणि कॅरोलिन मूस
माजी व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू जेसन कॉलिन्सने राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन (NBA) मध्ये 13 हंगाम खेळले. NBA च्या एका हंगामाच्या समाप्तीनंतर त्याने समलिंगी संबंधात असल्याचे जाहीरपणे कबूल केले. कॉलिन्स 2001 पासून कॅरोलिन मूससोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. माजी बास्केटबॉलपटू कॅरोलिन मूसने अमेरिकेसाठी ज्युनियर ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.
अॅलेक्स ब्लॅकवेल आणि लिन्से एस्क्यू
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅलेक्स ब्लॅकवेलने 2013 मध्ये समलिंगी संबंधात असल्याची कबुली दिली होती. इंग्लंडचा क्रिकेटर स्टीव्हन डेव्हिस नंतर समलैंगिक संबंधात असलेली ती दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होती. बॅट्समन अल्केस ब्लॅकवेलने 2015 मध्ये इंग्लंडचा माजी क्रिकेटर लिन्से एस्क्यूशी लग्न केले. तथापि, 2017 पर्यंत त्यांचे लग्न ऑस्ट्रेलियात वैध मानले जात नव्हते.