विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या लाटेदरम्यान बहुतांश लोकांना खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, गंध आणि चव जाणे, अशी लक्षणे दिसून आली. कोविडच्या अनेक रुग्णांना यापैकी कोणतीच लक्षणे दिसली नाहीत. मात्र डोकेदुखी आणि घशात खवखव निर्माण होण्याची स्थिती हे सामान्य कोविडचेच लक्षणे आहेत, असे एका संशोधनात आढळले आहे.
इंग्लंडमधील किंग्ज कॉलेजमध्ये कोरोना विषाणू निरीक्षण प्रकल्पावर संशोधक काम करत आहेत. हा आजार आता वेगळ्या पद्धतीने बळावत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून वेगाने फैलावत असलेला भारतीय डेल्टा व्हेरिएंट या लक्षणांच्या बदलामागे असू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
प्रमुख संशोधक प्रा. टिम स्पेक्टर सांगतात, लोकांना सामान्य सर्दी असल्यास त्यांनी चाचणी करावी. त्याने कोविडच्या कोणत्याही संभाव्य प्रसाराला रोखण्यास मदत मिळू शकते. विषाणूची लक्षणे ओळखण्यासाठी किंग्ज कॉलेजने झेडओई नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपला मागील मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते. देशातील सर्वात मोठा लक्षणे ट्रॅकिंग प्रकल्प आहे.
महामारीच्या सुरुवातील वेगाने खोकला सर्वात सामान्य लक्षण होते. त्यामध्ये ४६ टक्के संक्रमित रुग्णांना ते संक्रमित झाल्याची कल्पनाच नव्हती, असे झेडओई अॅपद्वारे विश्लेषण केल्या जाणार्या डाटावरून लक्षात आले आहे. प्रा. स्पेक्टर सांगतात, लोकांना साधी सर्दी झाल्याची कल्पनाच नाही. ते एखाद्या पार्टीमध्ये जातात आणि सगळीकडे विषाणूच्या फैलावास कारणीभूत ठरतात.
प्रा. स्पेक्टर पुढे सांगतात, मे महिन्याच्या सुरुवातीपासून आम्ही लक्षणांवर लक्ष ठेवून आहोत. आधी जशी लक्षणे होती तशी आता ती दिसत नाहीत. एक नंबर डोकेदुखी, गळ्यात खवखव, नाक वाहणे, ताप आणि खोकला अशी लक्षणे आहेत. कोरोनाच्या लक्षणांमध्ये थकवासुद्धा आहे. सुरुवातीच्या लक्षणानंतर थकवा जाणवायला लागतो.