मुंबई – कोणताही व्यक्ती असो दैनंदिन जीवन जगताना आपल्याकडे थोडा फार पैसा असावा आणि भविष्यासाठी बचत करावी, असे प्रत्येकाला वाटते. म्हणून प्रत्येक जण बचत खाते उघडून त्यात पैसे ठेवतो, पण त्यातही आपल्याला अधिक व्याज मिळावे, असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेक जण माहिती घेतात. याबाबत अनेक जण फिक्स डिपॉझिटचे दर कमी झाल्यापासून बँक ग्राहक बचत खात्यात पैसे ठेवू लागले आहेत. कारण एफडी दरांच्या तुलनेत बचत खात्यावर अधिक व्याज मिळत आहे. बचत खाते व्याज मिळवताना पैसे केव्हाही जमा करण्यास, ठेवण्यास आणि काढण्याची परवानगी असते.
बचत खात्याचे अनेक फायदे आहेत रोख पैसे काढणे, व्याजाची कमाई, पैशाची सुरक्षितता, बचत खाते आणि मुदत ठेवी दरम्यान ऑटो स्वीप सुविधेमुळे अतिरिक्त कमाई आणि खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका बचत खाते सुविधा देतात. HDFC बँक आणि ICICI बँक सारख्या मोठ्या खाजगी बँकांच्या तुलनेत छोट्या खाजगी बँका नवीन किरकोळ ग्राहकांसाठी बचत खात्यांवर जास्त व्याजदर देतात.
बचत खात्यांवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 खाजगी बँका या आहेत.
1 ) एयु स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता रुपये 2,000 ते 5,000 आहे.
2 ) उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याजदर देत आहे. त्यामुळे ग्राहक येथे बचत करतात.
3 ) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक आवश्यकता रुपये 2,500 ते 10,000 रुपये आहे.
4 ) DCB बँक बचत खात्यांवर 6.5 टक्के पर्यंत व्याजदर देते. ही बँक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर देते. किमान शिल्लक रक्कम 2,500 ते 5,000 रुपये आहे.
5 ) सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. सरासरी मासिक शिल्लक रुपये 2,000 आहे. मोठ्या खाजगी बँकांपेक्षा लहान खाजगी बँका बचत खात्यांवर जास्त व्याजदर देतात.