विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यावर आता आपल्याला कोरोना होणार नाही, असे काही लोकांना वाटते. परंतु कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो, असे मत एका सर्वेक्षणानंतर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना लसचे दोन्ही डोस मिळवूनही कोरोना संसर्ग होण्याचा धोका होऊ शकतो. म्हणून, या लोकांनी धोका टाळण्यासाठी शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन आणि मास्क घालण्यासह इतर सुरक्षिततेच्या उपायांची विशेष काळजी घ्यावी. तसेच अभ्यासांवरून असे दिसून येते की, दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये ही लस कमी प्रभावी आहे. सामान्य प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या तुलनेत त्यांच्यात अँटीबॉडीज कमी पातळी असल्याचे आढळले.
अवयव प्रत्यारोपण केलेल्या ६५८ लोकांवर झालेल्या अभ्यासानुसार हा निष्कर्ष काढला गेला असून लसीच्या दुसर्या डोसनंतर यामध्ये अॅन्टीबॉडीजच्या उपस्थितीचे मूल्यांकन केले गेले. संशोधकांना असे आढळले की, लसच्या दोन्ही डोसांनंतर या सर्वेक्षणात सहभागी लोकांमध्ये ओळखण्यासाठी पुरेसे प्रमाणात अॅन्टीबॉडीज आढळले नाहीत. लसीचे दोन्ही डोस प्राप्त झाल्यानंतर अॅन्टीबॉडीज केवळ ५४ टक्के आढळली. त्याचप्रमाणे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या ६० लोकांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, लसीकरणानंतर केवळ निम्म्या जणांना अँटीबॉडीज आहेत.
या अभ्यासानुसार ल्युकेमिया किंवा लिम्फोमा असलेल्या रूग्णांमध्येही लसीकरणानंतर विशिष्ट अॅन्टीबॉडीज तयार होत नाहीत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रमुख संशोधक ब्रायन बोयार्स्की म्हणाले की, सर्वेक्षण निकालांच्या आधारे आम्ही शिफारस करतो की, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती समस्येमुळे त्रस्त लोकांनी कोरोना नियमांचे कठोरपणे पालन करावे.