सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा वेळेवर पुरवठा व्हावा; यासाठी जिल्हाधिका-यांनी दिले हे निर्देश

by India Darpan
एप्रिल 18, 2021 | 2:16 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210418 WA0042

नाशिक : जिल्ह्यामध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे रुग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची व रेमडेसिवीरची ही मागणी त्याप्रमाणात वाढत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा वापर करावा जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल,त्यासाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ही पथके आजपासूनच कार्यरत करण्यात आली आहेत.

आज जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिवीर बाबत जिल्ह्यातील पथक प्रमुख प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. या बैठकीस नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी  दत्तप्रसाद नडे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मालेगाव महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त  धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, प्रशांत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, जिल्हा उद्योग केंद्र, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, सद्यस्थितीमध्ये संपूर्ण राज्यभर ही कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यस्तरावरून होणारा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकारणास्तव जिल्ह्यातील सर्व रूग्णालयातील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरबेड, आयसीयू बेड इत्यादी बाबत माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर रुग्णालयांमध्ये त्याप्रमाणे व्यवस्था अस्तित्वात आहे किंवा नाही याची खात्री करण्यात यावी, सदर रुग्णालयांना पुरवठा होणारा ऑक्सिजन तज्ञांचे मार्गदर्शन सूचनांनुसार योग्य रीतीने वापरला जात आहे किंवा नाही व संबंधित रुग्णालयांची वितरण व्यवस्था, साठवणूक क्षमता इत्यादी बाबतीत नियंत्रण आणि तपासणी करण्यात यावी.

तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून त्या अनुषंगाने काही रुग्णालये सरळ रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सदरचे इंजेक्शन विकत घेऊन आणण्याबाबत लिहून देत आहेत. जिल्ह्यात सदर औषधाची टंचाई अथवा काळाबाजार या बाबतीतकाही तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर औषधाचे वाटपाकरिता मध्यवर्ती कक्ष स्थापन केलेला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात दररोज प्राप्त रेमडेसिवीर इंजेक्शन साठा, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या व ज्यांना सदर औषध आवश्यक आहे अशा रुग्णालयांचे मागणीप्रमाणे प्राप्त साठा विचारात घेवून  दैनंदिन वाटप नियंत्रण केले जात आहे. सदर साठा रुग्णालयात प्राप्त झाल्यानंतर तो साठा संबंधित ज्या रुग्णांकरिता मागणी केला आहे त्याच रुग्णांना दिला आहे किंवा कसे, याची खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार आहेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सर्व जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णांना आवाहन केले आहे की, कोविड रुग्णांचे बाबतीत ऑक्सिजनव रेमडेसिवीर  इंजेक्शनचा सरसकट सर्व रुग्णांनी वापर करणे योग्य नाही, याचे वापराबाबत शासन, या क्षेत्रातील तज्ञ आणि इंडियन मेडिकलअसोशिएशन यांचे द्वारे निर्गमित मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच या बाबींचा वापर करावा जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल.

या अनुषंगाने जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका क्षेत्रांमध्ये संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागांमध्ये संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांचेमार्फत वेगवेगळी पथके तयार करण्यात येऊन उपरोक्त दोन्ही विषयांच्या अनुषंगाने काटेकोर तपासणी करण्यात येणार असून त्याबाबतयोग्य वापर सुनिश्चित केला जाईल. ज्या ठिकाणी या बाबींचा नियमबाह्यकिंवा गैरवापर करण्यात आल्याचे निदर्शनास येईल त्याठिकाणी सक्त कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी . मांढरे यांनी दिल्या आहेत.

ही पथके स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश गरजू रुग्णांपर्यंत  औषध व ऑक्सिजन पोहोचवणे हा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाचे तसेच क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय व्यावसायिकांचे देखील सहकार्य प्राप्त करून घेण्याची सूचना  जिल्हाधिकारी मांढरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वांचे अथक प्रयत्न आणि सहकार्याने आपला नाशिक जिल्हा याही परिस्थितीवर लवकरच मत करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘एक देश एक रेशनकार्ड’: नाशिक जिल्ह्यात इतक्या जणांना मिळाला लाभ

Next Post

रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात ? जयंत पाटील यांचा सवाल

India Darpan

Next Post
jayant patil

रेमडेसिवीरसारखं औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात ? जयंत पाटील यांचा सवाल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011