नवी दिल्ली – Whatsapp तर्फे आयओएस युजर्ससाठी दोन मोठे बदल करण्यात आले असून, त्याची घोषणा करण्यात आली आहे. Whatsapp लेटेस्ट अपडेट केल्यानंतर युजर्स प्री व्ह्यू मोडमध्ये इमेज आणि व्हिडिओ पाहू शकणार आहेत. नव्या अपडेटमध्ये Disappearing Message फिचरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सर्व नवीन अपडेट Whatsapp च्या लेटेस्ट २.२१.७१ IOS व्हर्जनमध्ये दिसणार आहेत. सर्व अपडेट Apple App Store वर उपलब्ध आहेत. Whatsapp चे नवे अपडेट दिसत नसल्यास तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
काय होणार बदल
Whatsapp वर आतापर्यंत युजर्स फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकत होते. तेव्हा तुम्हाला प्री-व्ह्यू फोटो आणि व्हिडिओ खूपच लहान दिसत होते. परंतु नव्या अपडेटनंतर Whatsapp फोटो आणि व्हिडिओ लहान स्क्वेअर खूपच मोठा दिसणार आहे. हे अपडेट लवकरच अँड्रॉइड व्हर्जनमध्ये दिसणार आहेत.
अॅडमिनच्या अधिकारात कपात
Whatsapp च्या ग्रुप मेसेजचे सर्व अधिकार अॅडमिनच्या हातात होते. परंतु नव्या अपडेटनंतर डिसअॅपअरिंग मेसेज कंट्रोल फिचरचा अधिकार ग्रुपमधील इतर सदस्यांना मिळणार आहे. कोणत्या व्यक्तीला ग्रुपमध्ये ठेवायचे किंवा नाही हा अधिकार अॅडमिनकडेच राहणार आहे. ग्रुप अॅडमिन सेटिंग बदलून ओनली अॅडमिन असा बदल करू शकणार आहे.
डिसअॅपिअरिंग मेसेज फिचरला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केले होते. या फिचरला ऑन केल्यानंतर ग्रुपमध्ये पाठवलेला कोणताही मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलिट होतो. हे फिचर पर्सनल आणि ग्रुपसाठी जारी केले होते. डिसअॅपिअर मेसेजला फॉरवर्ड करू शकत नाही. परंतु मेसेजला कॉपी करू शकतो. तसेच स्क्रिनशॉटसुद्धा काढू शकतो. या फिचरला मॅन्युअली ऑफ किंवा ऑन करता येते.