शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतात वाहतूक विमान या कंपन्या तयार करणार; ३० ऑक्टोबरला प्रकल्पाची पायाभरणी

ऑक्टोबर 28, 2022 | 12:11 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
download 30

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने ८ सप्टेंबर २०२१ रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने २४ सप्टेंबर २०२१ रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली येथे २७ ऑक्टोबर २०२२ रोजी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, करारा अंतर्गत, १६ विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील आणि ४० विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २१,९३५ कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.

वितरण वेळापत्रक
उड्डाणासाठी सज्ज अशी पहिली १६ विमाने सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान मिळणार आहेत. पहिले स्वदेशी अर्थात मेड इन इंडिया विमान सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

विमानाची क्षमता
सी-295एमडब्लू हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ५-१० टन क्षमतेचे वाहतूक विमान आहे. भारतीय हवाई दलाच्या जुन्या अॅवरो (Avro) विमानाची ते जागा घेईल. जलद प्रतिसाद आणि जवान तसेच सामान उतरवण्यासाठी यात खास रिअर रॅम्प दरवाजा आहे. अंशतः तयार पृष्ठभागांवरून उड्डाण आणि ते उतरवण्याची क्षमता हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे विमान भारतीय हवाई दलाची दळणवळण क्षमता मजबूत करेल.

आत्मनिर्भरता
हा प्रकल्प भारतीय खाजगी क्षेत्राला तंत्रज्ञान सुसज्ज आणि अत्यंत स्पर्धात्मक विमान वाहतूक उद्योगात प्रवेश करण्याची अनोखी संधी देतो. यामुळे देशांतर्गत विमान निर्मितीला चलन मिळेल. परिणामी, आयात अवलंबित्व कमी होईल आणि निर्यातीत अपेक्षित वाढ होईल. सर्व ५६ विमाने भारतीय डीपीएसयू- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटमध्ये बसवली जातील. हवाई दलाला सर्व ५६ विमानांचा पुरवठा झाल्यानंतर, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेसला, भारतात तयार झालेली विमाने देशांतर्गत नागरी विमान कंपन्यांना विकण्याची आणि भारत सरकारने मान्यता दिलेल्या देशांना निर्यात करण्याची परवानगी दिली जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिग बॉस १६: शालीन भानोतला घराबाहेर काढण्याची मागणी

Next Post

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; केल्या या प्रमुख मागण्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20221028 WA0003 e1666939509400

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; केल्या या प्रमुख मागण्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011