मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्यात अनेक सेलिब्रेटींनाही बाधा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाल्याची बाब नुकतीच उजेडात आली. त्यात आता आणखी काही जणांची भर पडली आहे. त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रोहित पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. या सर्वांनी ट्वीट करुन तशी माहिती दिली आहे.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1478258211882819585?s=20
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि कुठलेही लक्षणे असतील तर तातडीने उपचार घ्यावेत.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1478040040307523586?s=20
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन सांगितले आहे की त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मला अत्यंत सौम्य लक्षणे जाणवत आहेत. मी स्वतःला घरातच विलगीकरणात आहे. जे माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी तत्काळ चाचणी करुन घ्यावी.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1478194868853694470?s=20