मुंबई – इंटरचेंज शुल्क आणि इतर खर्च वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे काही वाहनांच्या किंमती जानेवारीपासून महाग होणार आहेत. वाहन निर्माता कंपन्यांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मारुतीची वाहने होणार महाग
उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता मारुती सुझुकी इंडियाने जानेवारीपासून पुन्हा वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षातच कंपनीकडून ही चौथी दरवाढ करण्यात आली आहे. मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, पोलाद, अॅल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिकसह सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. वाहन निर्मितीसाठी या वस्तूंचा वापर ७५-८० टक्के केला जातो. एप्रिल-मे महिन्यादरम्यान पोलादचे भाव ३८ रुपये प्रति किलो झाले होते. आता ७७ रुपये मोजावे लागतात. अॅल्युमिनिअमचे दरही १७०० ते १८०० डॉलर प्रतिटनवरून वाढून २७०० ते २८०० डॉलर प्रतिटन झाले आहे. उत्पादनात वाढणारा खर्च पाहून पुन्हा वाहनांच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत.
ऑडीच्या किंमतीत वाढ
जर्मनीमधील ऑडी या आलिशान कार निर्माता कंपनीने जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों जागतिक बाजारपेठेत उत्पादनातील वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही आम्हाला किमती वाढवाव्य लागणार आहेत.