विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविड -१९ लसीकरण वाढविण्यासाठी काही सरकारी बँका फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) ठेवींवर जास्त व्याज दर देत आहेत, परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. कोविड लसीचा किमान एक डोस घेतलेल्या अर्जदारांना ९९९ दिवसांच्या एफडीवर ३० बेसिस पॉईंट्स किंवा ०.३० टक्के जास्त व्याज दर देण्यात येईल, असे युको बँकेने जाहीर केले आहे.
एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही लसीकरण वाढवण्यासाठीही ही पावले उचलत आहोत. तसेच दि. ३० सप्टेंबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी ग्राहकांना ही ऑफर देत आहोत. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नुकतीच लसीकरणासाठी असलेल्या कार्डवर २५ बेस पॉईंट्स अतिरिक्त व्याज दराने इम्यून इंडिया डिपॉझिट योजना देखील सुरू केली आहे. नव्या ऑफरची मुदत १, १११ दिवसांची असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे की, आता १८ वर्षांवरील सर्वांसाठी केंद्र सरकार दि. २१ जूनपासून अर्थात योग दिनापासून मोफत लसीकरण करणार आहे. तसेच पंतप्रधान म्हणाले की, लसीवर संभ्रम पसरवू नका आणि लोकांच्या जीवाशी खेळू नका. खासगी रूग्णालयात लसी घेणार्यांची व्याप्ती वाढविण्यासाठीही सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलणार आहे.