शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधानांच्या जपान दौ-यात झाले हे सामंज्यस करार….हा होणार दोन्ही देशांना फायदा

by Gautam Sancheti
ऑगस्ट 30, 2025 | 6:38 am
in मुख्य बातमी
0
Untitled 46

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-

  1. पुढील दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन
    • आर्थिक भागीदारी, आर्थिक सुरक्षा, गतिशीलता, पर्यावरणीय शाश्वतता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, आरोग्य, व्यक्ती -व्यक्ती आणि राज्य-प्रांत सहभाग या आठ प्रयत्नरेषांमध्ये आर्थिक आणि कार्यात्मक सहकार्यासाठी 10 वर्षांचे धोरणात्मक प्राधान्य
  2. सुरक्षा सहकार्याबाबत संयुक्त जाहीरनामा
    • आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या अनुषंगाने समकालीन सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी आमचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य विकसित करण्यासाठी एक व्यापक चौकट
  3. भारत – जपान मनुष्यबळ आदानप्रदान कृती आराखडा
    • पुढील पाच वर्षांत भारत आणि जपानमधील 5,00,000 लोकांचे, विशेषतः भारतातून जपानमध्ये 50,000 कुशल आणि अर्ध-कुशल कर्मचाऱ्यांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी एक कृती आराखडा.
  4. संयुक्त पतपुरवठा यंत्रणेबाबत सहकार्य करार
    • भारताच्या हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना हातभार लावणारे, भारतात जपानी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे आणि भारताच्या शाश्वत विकासाला हातभार लावणारे डीकार्बोनायझिंग तंत्रज्ञान, उत्पादने, प्रणाली तसेच पायाभूत सुविधांचा प्रसार सुलभ करणारे एक साधन.
  5. भारत – जपान डिजिटल भागीदारी 2.0 बाबत सामंजस्य करार
    • डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, डिजिटल प्रतिभेचा विकास आणि एआय, आयओटी, सेमीकंडक्टर्स यासारख्या भविष्यकालीन तांत्रिक क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि विकास यामध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी एक दस्तऐवज.
  6. खनिज संसाधनांच्या क्षेत्रात सहकार्य करार
    • प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास, शोध आणि खाणकामासाठी संयुक्त गुंतवणूक आणि महत्त्वाच्या खनिजांच्या साठवणुकीसाठी प्रयत्न यासह अत्यावश्यक खनिजांसाठी पुरवठा साखळी लवचिकतेमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी एक साधन.
  7. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्था यांच्यात संयुक्त चंद्र ध्रुवीय अन्वेषण मोहिमेसंदर्भात अंमलबजावणी व्यवस्था
  • चांद्रयान 5 मोहिमेबाबत भारत आणि जपान यांच्यातील सहकार्यासाठी अटी आणि शर्ती परिभाषित करणारा एक दस्तऐवज, जो एका ऐतिहासिक सहकार्याला व्यवहार्य आकार देईल
  1. स्वच्छ हायड्रोजन आणि अमोनियाबाबत संयुक्त इरादा घोषणापत्र
  • हायड्रोजन/अमोनियावरील प्रकल्पांच्या संशोधन, गुंतवणूक आणि अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेषावर सहकार्य दृढ करण्यासाठी एक दस्तऐवज.
  1. सांस्कृतिक आदानप्रदानाबाबत सहकार्य करार
  • प्रदर्शने, संग्रहालय सहकार्य आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानाद्वारे कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याचे एक साधन
  1. विकेंद्रित घरगुती सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सामंजस्य करार
  • सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सांडपाण्याचा प्रभावी पुनर्वापर आणि विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापनात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक दस्तऐवज
  1. पर्यावरण सहकार्याच्या क्षेत्रात सहकार्य करार
  • प्रदूषण नियंत्रण, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैवविविधतेचा शाश्वत वापर आणि पर्यावरणीय तंत्रज्ञान यासारख्या पर्यावरण संवर्धनाशी संबंधित क्षेत्रात सहकार्यासाठी एक सक्षम व्यवस्था
  1. सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था आणि जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार
  • परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात परस्पर सामंजस्याला चालना देण्यासाठी राजनैतिक अधिकारी , शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, तज्ज्ञ आणि संशोधक यांच्यात देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यवस्था
  1. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जपानच्या शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (MEXT) यांच्यात संयुक्त इरादापत्र
    *शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या देवाणघेवाणी द्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवणे, स्टार्ट-अप्स आणि उद्योगांच्या सहभागातून दोन्ही देशांच्या संशोधन आणि वैज्ञानिक संस्थांमधील संस्थात्मक सहकार्य बळकट करण्याबाबतची घोषणा

इतर उल्लेखनीय बाबी

  1. पुढील दशकासाठी जपानकडून भारतात 10 ट्रिलियन जेपीवाय खासगी गुंतवणुकीचे उद्दिष्ट.
  2. भारत आणि जपानने सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा, दूरसंचार, औषधनिर्माण, महत्त्वपूर्ण खनिजे तसेच नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवण्यासाठी आर्थिक सुरक्षा उपक्रमाची सुरुवात.
  • या क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्याची उदाहरणात्मक यादी म्हणून, इकॉनॉमिक सिक्युरिटी फॅक्ट शीट देखील जारी करण्यात आली.
  1. भारत-जपान एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उपक्रमाचा शुभारंभ.
  • विश्वासार्ह एआय परिसंस्थेला चालना देण्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेल्स, प्रशिक्षण, क्षमता विकासात सहकार्य वाढवणे, आणि व्यवसाय आणि स्टार्ट-अप्सना समर्थन देणे.
  1. नेक्स्ट-जनरल मोबिलिटी पार्टनरशिपचा शुभारंभ.
  • गतिशीलता उत्पादने आणि उपायांच्या ‘मेक-इन-इंडिया’ वर लक्ष केंद्रित करून, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि गतिशीलता क्षेत्रात विशेषतः रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते, शिपिंग आणि बंदरे यामध्ये G2G आणि B2B भागीदारीला प्रोत्साहन देणे.
  1. आपापल्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या भारतीय आणि जपानी एसएमई यांच्यातील सहकार्य बळकट करण्यासाठी भारत – जपान लघु आणि मध्यम उद्योग मंचाचा शुभारंभ.
  2. ऊर्जा सुरक्षा, शेतकऱ्यांची उपजीविका आणि बायोगॅस आणि जैवइंधन यासारख्या शाश्वत इंधनाशी संबंधित तंत्रज्ञानात संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी शाश्वत इंधन उपक्रमाचा शुभारंभ.
  3. राज्ये आणि प्रांतांमधील उच्चस्तरीय देवाणघेवाण, ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या परराष्ट्र कार्यालयांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या तीन भेटींचा समावेश.
  4. भारत आणि कानसाई व क्युशू या दोन प्रातांमध्ये व्यवसाय, लोकांमधील संबंध आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी व्यवसाय मंचांची स्थापना.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको…नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची वेगळी भूमिका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rape2
इतर

लग्नाचे आमिष दाखवत रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 30, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

घरच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे शासनाच्या या पोर्टलवर अपलोड करा…सांस्कृतिक मंत्र्याचे आवाहन

ऑगस्ट 30, 2025
540741271 1326862786112755 305345827109706478 n e1756518596652
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची आ. सुरेश धस यांनी घेतली भेट…दिली ही महत्त्वाची माहिती

ऑगस्ट 30, 2025
सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाला अचानक भेट 2 1024x682 1
संमिश्र वार्ता

महसूल मंत्री उद्विग्न, या कार्यालयात आला वाईट अनुभव…दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश

ऑगस्ट 30, 2025
Untitled 47
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको…नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची वेगळी भूमिका

ऑगस्ट 30, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
Next Post
Untitled 47

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको...नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची वेगळी भूमिका

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011