मुंबई – बॉलीवूड मध्ये काम करण्याचे स्वप्न अनेक तरुणी पाहतात, परंतु त्यांना संधी मिळतेच असे नाही. मात्र काही जण अत्यंत स्ट्रगल करीत या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत प्रसिद्धी होऊन चमकतात. परंतु त्यानंतर लग्न झाल्यावर पुन्हा अभिनय करावा की नाही असा विचार त्या करतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदरी तथा अभिनेत्रींनी लग्ना झाल्याबरोबरच फिल्म इंडस्ट्री सोडली होती. ही यादी खूप मोठी आहे. त्यातील काही जण आपल्याला माहित आहेत, आणि आता या यादीत कतरिना कैफचाही समावेश होईल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊ या की कोणत्या हिरॉइन्ससोबत लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीला टा-टा बाय बाय केले जात होते आणि लग्नानंतर कॅटरिनाचे काय प्लॅनिंग आहे?
भाग्यश्री : सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवणाऱ्या भाग्यश्रीने वयाच्या १९ व्या वर्षी लग्न करून चाहत्यांची मने नाराज केली. त्यानंतर ती चित्रपटांमध्येही दिसली नाही.
नितू सिंग : कपूर : लग्नानंतर नीतू कपूरने आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटसृष्टीत उत्तम काम केल्यानंतर नीतूला हा निर्णय घेणे सोपे गेले नाही .
ट्विंकल खन्ना : ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांचा विवाह सन२००१ मध्ये झाला होता. तेव्हापासून ट्विंकलने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे.
सोनाली बेंद्रे : सन २०१२मध्ये सोनाली बेंद्रेने गोल्डी बहलसोबत लग्न केले आणि त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. काही वर्षांच्या कालावधीनंतर, त्याने ‘कल हो ना हो ‘आणि ‘ ‘ वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा ‘ या चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केल्या.
सायरा बानो : अभिनेत्री सायरा बानो २२ वर्षांची होती, तेव्हा तिचे दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर सायरा बानो यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, लग्नानंतर चित्रपटात काम केल्याचा पश्चाताप होत नाही.
नम्रता शिरोडकर : अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने सन २००५ महेश बाबूशी लग्न केले. तेव्हापासून ती कुटुंबासह हैदराबादला शिफ्ट झाली.
मीनाक्षी शेषाद्री : मीनाक्षी शेषाद्रीनेही लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण हरीश म्हैसूरशी लग्न केल्यानंतर मीनाक्षी अमेरिकेत शिफ्ट झाली. आता मीनाक्षी तिथल्या मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवते.
बबिता : लग्नापूर्वी बबिताने एकूण १९ चित्रपटांमध्ये काम केले होते. बबिता रणधीर कपूरसोबत लग्न करताना अवघ्या २३ वर्षांची होती. करिश्मा आणि करिनाच्या जन्मानंतर रणधीर आणि बबिता वेगळे झाले. मात्र २० वर्षांनंतर त्यांचे नाते पुन्हा जुळले.
मंदाकिनी : ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ फेम मंदाकिनीने लग्नानंतर काही चित्रपटांमध्ये काम केले पण नंतर तिने काम बंद केले.