इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, साहजिकच त्यामुळे महागाई देखील वाढली आहे, दर महिन्याला या इंधनाचे दर वाढत असतात, तर कधी दोन पाच रुपयांनी थोडेफार कमी होतात. मात्र त्यामुळे लगेच काही महागाई कमी होत नाही, मात्र पेट्रोलचे दर जर 12 रुपये झाले तर? कुणालाही आश्चर्य वाटेल ! परंतु ते शक्य आहे, असे एक उद्योगपती म्हणतात, काय आहे नेमका प्रकार?
देशात इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाईने कहर सुरु केला आहे. यातच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी त्याचा फायदा काही ग्राहकांना मिळत नाहीय. वाढलेल्या वस्तूंच्या किंमती आणखी महाग करण्याचे काम जीएसटीने केले आहे. असे असताना आता जे कच्चे तेल ५० रुपये लीटरने आपण विकत घेत आहोत, ते अवघ्या १२ रुपयांना मिळेल, असा दावा प्रसिद्ध भारतीय उद्योगपतीने अनिल अग्रवाल यांनी केला आहे.
अग्रवाल हे वेदांता लिमिटेड या मोठ्या कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांच्या मते सरकारने जर ठरवले तर देशात 12 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळू शकते. त्यांनी त्यासाठी काही उपाय योजना सांगितल्या आहेत. उद्योगपती अग्रवाल यांच्या मते, सरकार तेल साठे शोधण्यात आणि उत्पादनात खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेतले तर भारतच स्वतः मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करु शकेल आणि त्यामुळे भारताला आयातीवर खूप काळ अवलंबून रहावे लागणार नाही आणि खर्च कमी झाल्याने आयात केलेल्या तेलापेक्षा हे इंधन तीन चतुर्थांश स्वस्त पडेल.
गेल्या 10 वर्षात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या. वर्षभरात तर या किंमतींनी शंभर ओलांडली. जनतेचा प्रचंड रोष बघता सरकारने कर कपातीचा फॉर्म्यूला वापरला आणि तेलाच्या किंमती 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान घसरल्या. परंतू, तरीही इंधनाचे दर अधिक आहे. भारत इंधनासाठी आयातीवर निर्भर आहे. आखाती देश, रशिया आणि इतर देशातून कच्च्या तेलाची आयात करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावानुसार तेल कंपन्यांना माल खरेदी करावा लागतो. त्यामुळे देशात तेलाचे दर स्थिर नसतात आणि त्यात सातत्याने वाढ होते.
अनिल अग्रवाल यांच्या मते, सरकारने तेल साठ्यांचा शोध व उत्पादनात खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. परिणामी देशातच कच्च्या तेलाचे उत्पादन होईल. आयात केलेल्या इंधनापेक्षा ते तीन चतुर्थांशने स्वस्त पडेल. वेदांता ग्रुप धातू आणि ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत कमालीचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे भारताला इतर देशांकडून व्यापार करताना आता ज्यादा किंमत मोजावी लागणार आहे.
सध्या भारत साधारणतः 100 डॉलर प्रति बॅरल दराने कच्च्या तेलाची आयात करत आहे. एका बॅरलमध्ये जवळपास 159 लीटर कच्चे तेल असते. सध्या तेल कंपन्यांना एक लिटर तेलासाठी 50 रुपये खर्च करावा लागत आहेत. भारतात जर तेल उत्पादन करण्यात आले तर, एका बॅरलसाठी जवळपास 25 डॉलर म्हणजे प्रति लिटरसाठी 12 रुपये खर्च येईल. जर कच्चे तेल स्वस्त झाले तर परिणाम पेट्रोल, डिझेलवर देखील होईल आणि ते देखील पन्नास रुपयांपेक्षा कमी दराने भारतीयांना मिळेल.
कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. वेदांत समूहाचे उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी केर्न ऑइल अँड गॅस (केर्न इंडिया) ने पुढील तीन वर्षांत 4 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 30 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत केयर्न इंडियाची उत्पादन मर्यादा तिप्पट करण्याची अग्रवाल यांची योजना आहे. केयर्न ऑइल अँड गॅस ही भारतातील सर्वात मोठी गैर-सरकारी तेल उत्पादक कंपनी आहे. देशात 51 नवीन गॅस आणि ऑइल ब्लॉक्स ड्रिल करण्याची त्यांची योजना आहे, ज्यामुळे उत्पादन वाढेल. दरम्यान, अग्रवाल यांनी गेल्या तीन वर्षांत तेल क्षेत्रात तब्बल २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अलीकडे, कंपनीने काही तेल आणि वायू क्षेत्रे देखील शोधली आहेत.
Then Petrol Wil get only on 12 Rupees Liter Industrialist Anil Agrawal