अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरात मोठ्या प्रमाणात चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान ठाकले आहे. सलग दोन दिवसात तीन ठिकाणी चोरी झाली असल्याने नागरीक देखील धास्तावले आहे. साईदत्त फार्मामध्ये चोरी झाली चोर चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यातच काल गुजरवाडा परिसरात पुरुषोत्तम विश्वमभर हे त्याच्या मुलाला भेटण्यासाठी नगर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करीत जे सापडेल ते घेऊन गेले. तसेच साळी गल्ली येथील भालेराव यांची दुचाकी गाडी व घरातील रोख रक्कम घेऊन पसार झाले. तर काळा मारुती रोडवरील अनुपम टेलर्स यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यानी रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. सततच्या होणाऱ्या चोऱ्या मूळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून या चोरांचा शोध घेणे हे देखील पोलिसांपुठे मोठे आव्हान उभे राहिले आहे.