कंपनीत ७१ हजाराची चोरी
नाशिक – सातपुर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून चोरट्यांनी ७० हजार १०० रूपयांचे तांब्याचे एल्बो चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.२०) उघडकीस आली. याप्रकरणी उमेश दत्तात्रय जाधव (रा. सुकेणकर लेन, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सातपुर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर डब्लु ३६ येथे असलेल्या कंपनीच्या वर्कशापची मागची खिडकी तोडून चारेट्यांनी आत प्रवेश केला. वर्कशॅापमध्ये ठेवलेले कॉपरचे प्रत्येकी १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे एकुण ७१ हजार १०० रूपयांचे ४५ कॉपर एल्बो चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गिते करत आहेत.
…..
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नाशिक – भरधाव अज्ञात कारणे दिलेल्या धडकेत दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना शिंदेगाव परिसरात शनिवारी (दि.१९) रात्री घडली. रामेश्वर मधुकर बोराडे (रा. नायगावरोड, शिंदेगाव, ता. नाशिक) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बोराडे हे रस्त्याने पायी घराकडे जात असताना शिंदेगावाकडून नायगावकडे भरधाव जाणार्या कारने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक गांगुर्डे करत आहेत.
…….