सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील सटाणा शहरातील पाणीपुरी विक्रेत्या तरुणाने गिरणा नदीपात्रात उडी मारल्याची घटना रविवारी घडली. रविवारपासून या तरुणाचा एनडीआरएफ पथकाने शोध घेतला, मात्र तो सापडू शकला नाही. तीन दिवसानंतर लोहणेर जवळील गिरणा नदी पात्रातील एका बंधाऱ्याजवळ स्थानिक पोहणाऱ्यांना संध्याकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळयांतर तो बाहेर काढण्यात आला. नदीपात्रात उडी मारणा-याचे मोहित प्रजापती असे त्याचे नाव असून सटाणा शहरातील पिंपळेश्वर भगात तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता.