सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वन संपत्ती आहे, या भागात मोठमोठे जंगल असल्याने या परीसरातून अवैधरित्या अनेक वेळेस वृक्षतोड झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास अवैधरित्या वृक्षतोड करून जात असलेल्या दोन पिकअप गाड्या आंबसन गावातील तरुणांनी पाठलाग करीत पकडून त्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा केल्या. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. दरम्यान पकडण्यात आलेल्या या गाड्यांची माहिती ता-हाबाद वनविभागाला देण्यात आली आहे.