गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्र सरकारच्या या दोन कंपन्या एकमेकांत होणार विलीन

by India Darpan
जून 24, 2021 | 7:04 am
in राष्ट्रीय
0
modi111

नवी दिल्ली -पंतप्रधानांच्या “किमान शासन कमाल कारभार ” या संकल्पनेच्या  दिशेने अंमलबजावणीसाठी  आणखी एक पाऊल उचलत  व्यवसाय  सुलभतेला प्रोत्साहन  आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राची कार्यक्षमता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘सेंट्रल रेलसाइड वेअरहाउस कंपनी लिमिटेड’ (सीआरडब्ल्यूसी) या मिनी रत्न श्रेणी -२ मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कम्पनीची सर्व मालमत्ता, दायित्व, हक्क आणि जबाबदाऱ्या यांचे सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मध्ये विलीनीकरण व हस्तांतरण करायला मान्यता दिली आहे. विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांच्या गोदाम, हाताळणी आणि वाहतूक यासारख्या समान कामांचे एकत्रीकरण होईल. आणि  एकाच प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्षमता, योग्य क्षमता वापर, पारदर्शकता, उत्तरदायित्व, आर्थिक बचत सुनिश्चित करण्यासाठी आणि नवीन गोदाम क्षमता वाढवण्यात मदत होईल.
कॉर्पोरेट कार्यालय भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर प्रशासकीय खर्चात बचत झाल्यामुळे रेलसाइड वेअरहाउस कॉम्प्लेक्सचा व्यवस्थापन खर्च (आरडब्ल्यूसी) ५ कोटी रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. आरडब्ल्यूसीच्या क्षमता वापरामध्येही सुधारणा होईल कारण सीडब्ल्यूसी सध्या साठवल्या जाणाऱ्या सिमेंट, खत, साखर, मीठ आणि सोडा या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू साठवण्याची शक्यता आहे. विलीनीकरण माल शेडच्या ठिकाणी आणखी किमान ५०  रेलसाईड गोदामे उभारण्यास मदत करेल. यामुळे कुशल कामगारांसाठी ३६,५००  आणि अकुशल कामगारांना ९,१२,५०० मनुष्य दिवस इतक्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णयाच्या तारखेनंतर ८ महिन्यांत हे विलीनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सीडब्ल्यूसी ही एक मिनी रत्न श्रेणी -1 मधील सीपीएसई आहे जी केंद्र सरकारकडून अधिसूचित कृषी उत्पादन व काही अन्य वस्तूंच्या गोदामांच्या उद्देशाने व तेथे संबंधित बाबींसाठी गोदाम महामंडळांचे नियमन करण्यासाठी १९५७ मध्ये स्थापन करण्यात आली. सीडब्ल्यूसी एक नफा कमवणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (पीएसई) आहे ज्याचे अधिकृत भांडवल १०० कोटी आहे आणि पेड अप भांडवल ६८.०२ कोटी रुपये आहे. सीडब्ल्यूसीने १० जुलै २००७ रोजी ‘सेंट्रल रेलसाइड वेअरहाऊस कंपनी लि.’ (सीआरडब्ल्यूसी) नावाची वेगळी सहाय्यक कंपनी स्थापन करून रेल्वेकडून भाड्याने घेतलेल्या जागेवर रेलसाइड वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्स / टर्मिनल्स / मल्टिमॉडल लॉजिस्टिक हब विकसित करणे, संपादित करणे आणि ऑपरेट करण्याची योजना असून यासाठी १० जुलै २००७ रोजी कंपनीची स्थापना केली. सीआरडब्ल्यूसी मध्ये ५० कर्मचारी आणि ४८ आउटसोर्स कर्मचारी आहेत. सध्या ते देशभरात २० रेलसाईड वेअरहाउसचे परिचालन पाहतात.  ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनीचे निव्वळ मूल्य  (पेड अप कॅपिटल प्लस फ्री रिझर्व) १३७.९४ कोटी रुपये आहे. सीआरडब्ल्यूसीने आरडब्ल्यूसीच्या विकास आणि परिचालनात विशेषत: कौशल्य विकसित केले मात्र  भांडवलाच्या कमतरतेमुळे आणि रेल्वे मंत्रालयाबरोबर त्याच्या सामंजस्य करारातील काही प्रतिबंधात्मक कलमांमुळे त्याची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
सीडब्ल्यूसी हा सीआरडब्ल्यूसीचा एकमेव भागधारक आहे आणि सर्व मालमत्ता आणि दायित्व आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या सीडब्ल्यूसीकडे हस्तांतरित केल्या जातील, त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही तर  समन्वय वाढेल. आरडब्ल्यूसीच्या परिचालन आणि विपणन यासाठी सीडब्ल्यूसीकडून ‘आरडब्ल्यूसी डिवीजन’नावाचा स्वतंत्र विभाग तयार केला जाईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अँटीव्हायरस क्षेत्रातील बाप माणूस जॉन मॅकफी आढळले मृतावस्थेत

Next Post

झी मराठी `सारेगमप` मध्ये नाशिकच्या डॅान बास्को स्कुलची राशी पंकज पगारे सुध्दा झळकणार

India Darpan

Next Post
IMG 20210624 WA0000 e1624518428584

झी मराठी `सारेगमप` मध्ये नाशिकच्या डॅान बास्को स्कुलची राशी पंकज पगारे सुध्दा झळकणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011