लासलगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव येथील बाजार तळावरील शिव नदीच्या पुलावर अचानक मारुती ओम्नी गाडीने पेट घेतला. गाडीत शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या गाडीतून धूर येऊ लागताच चालकाने गाडी थांबवली आणि गाडीने पेट घेतला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी घडली झाली आहे. गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी बादलीने पाणी आणत आग विझवण्याचा प्रयत्न केला.