नाशिक – नरेडको नाशिक यांच्याकडून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर पुणे यांना नाशिक भेटीत १७ जुन २०२२ रोजी निवेदन देऊन दस्त नोंदणी कार्यालयात भेडसावणाऱ्या विविध अडचणी मांडण्यात आलेल्या होत्या. या अडचणींची तात्काळ दखल घेत हर्डीकर यांनी नाशिक महानगर कार्यक्षेत्रात नोंदणी कार्यालयातील ताण बघता सुधारित व वाढीव वेळ करण्याचे आदेशित केले आहे. नाशिक महानगर कार्यक्षेत्रात नोंदणी कार्यालयातील सकाळ सत्र व दुपार सत्र याप्रमाणे सुरु राहणार आहेत. याचा सर्वांगीण फायदा बांधकाम व्यवसायीक, वकील वर्ग यांना होणार आहे तसेच नोंदणी कार्यालयातील कामकाजात सुसूत्रता येणार आहे.
नरेडको नाशिकच्या सर्व पदाधिकारी व सभासदांकडून हर्डीकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या निर्णयाचा नाशिक महानगरातील नागरिक व बाहेरगावी असलेले नागरिक जे दस्त नोंदणीकरिता येत असतात त्यांना फायदा होणार आहे.
असे असेल वेळापत्रक
१.सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक क्र. ४ – सकाळी ७. ३० ते ३. १५ (सकाळ सत्र)
२.सह दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक क्र. ४ – दुपारी १. ०० ते ८.४५ (दुपार सत्र)