अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाने गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावल्याने कळवण तालुक्यातील चणकापूर, पुनंद बरोबरच बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण भरून वाहू लागल्याने गिरणा-मोसम या नद्यांना पूर आला. या दोन्ही नद्यांचे मालेगाव मध्ये संगम होऊन ते पाणी गिरणा धरणात जाते, सध्या गिरणा नदी पात्रात २८१०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. बागलाण मधीलही अनेक लघु प्रकल्प ओसंडून वाहत असल्याने मोसम नदी पात्रात सध्या ३६८९ क्यूसेस इतका विसर्ग होत असल्याने नदी काठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.