मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाने इंधनाच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला. पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर कपात केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. शिंदे – फडणवीस सरकारचे पहिलं मोठ गिफ्ट राज्यातील जनतेला देण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत नगरपरिषद, नगरपंचायत, सरपंच पदाची थेट निवडणूक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बाजार समितीमधील सर्व शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थितीत होते.
यावेळी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), अभियान व केंद्र पुरस्कृत अमृत अभियान राज्यात राबवणार येणार असल्याचे सांगण्यात आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार असल्याचेही माहिती देण्यात आली. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची बंद करण्यात आलेली योजना पुन्हा सुरु करणार असल्याचीही घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बघा या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
Media interaction after the Cabinet Meeting today.#Maharashtra #CabinetDecisions https://t.co/HYgCPpHsY6
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) July 14, 2022