अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयात काल पासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली जिल्हयातील सटाणा तालूक्यात काल पावसाचा जोर होता. याच जोरदार पावसाने मुंजवाड येथील कांदा व्यावसायिक राजेंद्र जाधव यांनी चाळीत साठविलेला कांदा वाहून गेला. शेतात पाणी साचल्याने बांध फुटला आणि सगळ पाणी कांदा शेडमध्ये घुसून त्यातील १२ ट्रॅक्टर कांदा अक्षरशा सटाणा शहरा पर्यंत वाहून गेले. शेतकरी भास्कर सोनवणे यांचा ५० क्विंटल कांदा सुध्दा अचानक आलेल्या मुसळधार पावसात वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठ संकट कोसळे आहे. सरकारने तातडीने त्याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.