नवी दिल्ली -जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवली आहे.
या बैठकीनंतर जारी केलेल्या ट्विटर संदेशांचा माध्यमातून पंतप्रधान म्हणतात, जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवून ती बळकट करणे याला आमच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य आहे. मतदारसंघांची पुनर्रचना जलदगतीने झाली पाहिजे, जेणेकरून निवडणुका घेता येतील आणि विकासाच्या कक्षेला बळकटी देणारे एक निर्वाचित सरकार जम्मू आणि काश्मीरला मिळेल.
परस्परभिन्न मतप्रवाहही समोरासमोर बसून आपापल्या दृष्टिकोनांबद्दल चर्चा करू शकतात, हेच आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मी जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांना सांगितले की, जम्मू काश्मीरला जनतेने- विशेषतः तरुणाईने राजकीय नेतृत्व दिले पाहिजे आणि आशा-आकांक्षांची पूर्तता होण्याची काळजी घेतली पाहिजे.
Today’s meeting with political leaders from Jammu and Kashmir is an important step in the ongoing efforts towards a developed and progressive J&K, where all-round growth is furthered. pic.twitter.com/SjwvSv3HIp
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021
Our priority is to strengthen grassroots democracy in J&K. Delimitation has to happen at a quick pace so that polls can happen and J&K gets an elected Government that gives strength to J&K’s development trajectory. pic.twitter.com/AEyVGQ1NGy
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021
Our democracy’s biggest strength is the ability to sit across a table and exchange views. I told the leaders of J&K that it is the people, specially the youth who have to provide political leadership to J&K, and ensure their aspirations are duly fulfilled. pic.twitter.com/t743b0Su4L
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021