नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांच्याशी संवाद साधला आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एका व्टिटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले ; “आज @RishiSunak यांच्याशी बोलून आनंद झाला. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आम्ही आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करू. सर्वंकष आणि संतुलित मुक्त व्यापार करार लवकर अंमलात येणे महत्वाचे आहे, यावर आमची सहमती झाली.”
https://twitter.com/narendramodi/status/1585643229034483712?s=20&t=i3jDqMJuuHTMFZ1j0qFcKQ