नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रूग्णालयातील पुरूष जळीत वार्डात गुरूवारी छताचा भाग असलेली पीओपी कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे रूग्णांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. पावसामुळे काही ठिकाणी पाणी गळत आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दुस-या मजल्यावर असलेल्या या वार्डात सुशोभिकरणासाठी पीओपी करण्यात आले असून पाण्यामुळे त्याची दुरावस्था झाली आहे. आता यातील काही पीओपी ढासळून लागले आहे. ही घटना घडल्यानंतर उपस्थित कर्मचा-यांनी या भागातील रूग्ण अन्य वार्डात हलवले. गेल्या दोन वर्षापासून या रुग्णांलयाची डागडुजी झाली नाही. ती करावी अशी मागणी आता पुढे येत आहे.