अक्षय कोठावदे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे.या अपघातात दोन गायी जागीच मृत झाल्या आहेत. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्यात. ही घटना सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटे घडली.पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात,सहा गोवंश निर्दयतेने कोंबून त्यांची अवैधरित्या कत्तलीसाठी तस्करी करीत असतांना पिकअप (एमएच ०४ डीएस ९३९१) हे वाहन पहाटे साक्री तालुक्यातील सुकापूर ते होळ्याचापाडा या रस्त्याने जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेल्या असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ एका शेतात उलटले.या अपघातात दोन गायी जागीच मृत झाल्यात सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्यात अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाला घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना कळविण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून मृत गोवंशाचे शवविच्छेदन केले.तर पोकॉ. पंकज वाघ व रवींद्र सूर्यवंशी यांनी चार गायींची रवानगी गोशाळेत केली.शिवाय १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे पिकअप वाहन जप्त केले.रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने वाहन चालवून दोन गायींच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस तसेच अवैधरीत्या गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी करून अपघाताची माहिती पोलिसांना न देता पसार झालेल्या वाहन चालकासह मालकाविरूद्ध पोकॉ.पंकज वाघ यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार भादंवि कलम २७९,४२९,४२७ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९ ७७ चे सुधारित २०१५ चे कलम ५ (अ) चे उल्लंघन कलम ९ व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक करण्यास प्रतिबंध करणे अधिनियम १९६० चे कलम ११ ( १ ) ( घ ) ( ड ) ( च ) ( ट ) सह मोटार वाहन कायदा कलम १९ ८८ चे कलम ६६ ( १ )१९२,१३४/१७७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.