साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 18.17 टक्के पर्यंत कमी, गेल्या 24 तासात 15.73 लाखापेक्षा जास्त चाचण्या
नवी दिल्ली – कोरोनासंदर्भातल्या एका दिलासादायी घडामोडीत, 26 दिवसानंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात 2,81,386 नव्या रुग्णांची नोंद झाली.
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये 9 मे 2021पासून दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येतली सरासरी घट दर्शवण्यात आली आहे.
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरात घटता कल असून खाली दर्शवल्याप्रमाणे हा दर आज 18.17% आहे. गेल्या 24 तासात 15,73,515 चाचण्या तर आतापर्यंत 31,64,23,658 चाचण्या करण्यात आल्या.
पॉझीटीव्हिटी दर जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची राज्य निहाय संख्या खाली दर्शवण्यात आली असून कर्नाटकमध्ये सर्वात जास्त म्हणजे 27 जिल्ह्यांमध्ये हा दर 20 टक्क्याहून अधिक आहे. मध्य प्रदेशात 38 जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्क्याहून अधिक आहे.
भारतात कोरोना मुक्त झालेल्यांची एकूण संख्या आज 2,11,74,076 झाली आहे. आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 84.81% इतका आहे.
गेल्या 24 तासात 3,78,741 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त असण्याची गेल्या सात दिवसातली ही सहावी तर सलग चौथी वेळ आहे.