मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. राज्यातील विविध मोठ्या शहरासह हैद्राबाद येथे विविध ठिकाणी चो-या करणार अकबर खान ऊर्फ कबर चोरवा याला गावठी गावठी कट्टा व दोन जीवंत काडतूसांसह ताब्यात घेण्यात आले.
गेल्या १५ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणा-या अकबर चोरवा हा मालेगावात अवैधरित्या स्व;त जवळ हत्यार बाळगणारा व त्याची विक्री करणारा गुन्हेगार दहशत पसरवित असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधिक्षकांना मिळताच पोलिस पथकाने सापळा रचत किसमत सायजिंग जवळ छापा टाकून त्याल ताब्यात घेतले.
त्याची अंगझ़ती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केली असून त्याच्यावर पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावसह, परभणी, कन्नड, जळगाव, लातूर, अकोला, तुळजापूर व हैद्राबाद येथे मोबाईल दुकान, घरफोडीचे वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641319828136034304?s=20