बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘द काश्मीर फाईल्स’ वरील वक्तव्य भोवले; नदाव लापिड यांची इस्राएलच्या राजदूतांकडून कानउघडणी

by India Darpan
नोव्हेंबर 29, 2022 | 6:18 pm
in मनोरंजन
0
FiqpBcbacAUSWmW

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गोव्यामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अर्थात IFFI सुरू आहे. या महोत्सवात केलेल्या एका वक्तव्यामुळे चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक नदाव लापिड चर्चेत आले आहेत. नदाव लापिड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. इफ्फी मध्येही लापिड यांनी ‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटावर अश्लील आणि प्रचारकी थाटाचा चित्रपट असल्याची टीका केली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, भारतामधील इस्राएलमधील राजदूत नाओर गिलोन यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तसेच त्यांनी लापिड यांना खुलं पत्र लिहून त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे.

लापिड यांनी इफ्फीमध्ये केलेल्या वक्तव्यावर इस्राएलचे राजदूत नाओर गिलोन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि इस्राएल हे दोन मित्र देश असून या देशांतील नागरिकांतील मैत्री खूप घट्ट आहे. नदाव लापिड तुम्ही बोलून जे नुकसान केले आहे. ते भरून येईलही. मात्र एक व्यक्ती म्हणून मला या वक्तव्याची लाज वाटते. तसेच मी, आम्ही आमच्या यजमान देशाची त्या वर्तनासाठी माफी मागतो. त्यांचं औदार्य आणि मैत्रीची परतफेड आम्ही अशी केलीय, अशी खंतही गिलोन यांनी व्यक्त केली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी इस्राइली राजदूत नाओर गिलोन यांनी केलेल्या विधानाचं समर्थन करत ते रीट्विट केले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजित होत असतो. गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ५३ व्या चित्रपट महोत्सवात ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचं स्क्रिनिंग झाल्याने ज्युरी हेड नदाव लापिड यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच हा चित्रपट पाहून तो केवळ प्रचारकी आणि व्हल्गर आहे, असं वाटलं. अशा प्रकारचे चित्रपट एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आणि कलात्मक, स्पर्धात्मक वर्गासाठी योग्य नाहीत, असं विधान केलं होतं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

याबाबत इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी नदव लापिड यांची कठोर शब्दात कानउघाडणी केली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्याला देव मानले जाते. तुम्ही चित्रपट महोत्सवात परीक्षकांच्या पॅनलच्या अध्यक्षपदासाठी भारताने दिलेल्या निमंत्रणाचा गैरवापर केला आहे. तसेच भारताने तुमच्यावर जो विश्वास दर्शवला, आदरातिथ्य केले त्याचाही अपमान केला आहे. तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहे, असा सल्ला मी देतो, असेही गिलोन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नदाव लापिड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नदाव लॅपिड यांनी त्यांच्या ‘सिनॉनिम्स’ चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, इस्राएलमधील बहुतेक लोकांनी आपले आत्मे विकले आहेत, ते ‘सिक सोल’ झाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य देखील चर्चेत होते.

The Kashmir Files Israel Director Statement
IFFI 2022

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मंत्रिमंडळाने घेतले हे दोन मोठे निर्णय

Next Post

साहित्य सखीचे चौथे महिला राज्य साहित्य संमेलन २५ डिसेंबर रोजी नाशकात

Next Post
sahitya

साहित्य सखीचे चौथे महिला राज्य साहित्य संमेलन २५ डिसेंबर रोजी नाशकात

ताज्या बातम्या

Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011