मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड मध्ये कोणता चित्रपट प्रचंड चालेल हे सांगता येत नाही. आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या बाबतीत असे घडले आहे. आता देखील एका चित्रपटाच्याबाबत असेच घडून आले आहे. विवेक अग्रीहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. एकदम शांततेत, कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेला हा चित्रपट काश्मीर मुद्द्यावर आधारित आहे. त्याने 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा गाठला. या चित्रपटाने इतिहास रचला असून प्रचंड कमाईने जुने रेकॉर्ड मोडले…
खरे म्हणजे 7 दिवसात 100 कोटींचा आकडा गाठेल, अशी अपेक्षाही चित्रपट तज्ज्ञांना नव्हती. पहिल्याच दिवशी 3.55 कोटी कमावणाऱ्या काश्मीर फाइल्सने 7 दिवसांत देशात भावनिक वादळ निर्माण केले आहे. परिणामी, द काश्मीर फाइल्स हा बॉक्स ऑफिसचा इतिहास पुन्हा लिहित आहे.
काश्मीर फाइल्सला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस झाले आहेत. गुरुवारचे आकडे बघितले तर चित्रपटाची कमाई सुमारे 17.50 ते 19.50 कोटी, त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन 96.75 ते 98.75 कोटींच्या दरम्यान आहे. तर शुक्रवारी या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
काश्मीर फाइल्सकडून आता आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. खासकरुन वीकेंडला या चित्रपटाला आणखी प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. चित्रपटासाठी जे वातावरण निर्माण झाले आहे ते पाहता ते आणखी पुढे जाईल, असे वाटते. पण सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे की कोणत्याही सुपरस्टारशिवाय 3.55 कोटींपासून सुरू झालेला चित्रपट इतक्या लवकर 100 कोटींपर्यंत कसा पोहोचला.
अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या या चित्रपटासाठी हा मार्ग तितकासा सोपा नव्हता. कारण सुपरस्टार अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. आपल्या आवडत्या स्टारला नव्या अवतारात पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
द काश्मीर फाइल्सचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, एखाद्याला वाटेल की, बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे रिलीज पुढच्या तारखेपर्यंत पुढे ढकलले असावे. तथापि, निर्मात्यांना रिलीजच्या इतक्या जवळ पुढे ढकलण्यास उशीर झाला असावा.
विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वेगाने चालत असल्याने आहे. होळीमुळे संध्याकाळी उशिरा आणि रात्रीचे शो चांगलेच भरलेले असतील. अशा प्रकारे या चित्रपटाने स्वत: ला ब्लॉकबस्टर म्हणून स्थापित केले आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी, बच्चन पांडे या आठवड्यात प्रदर्शित झाला.