पंढरपूर – पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वाखरीला रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्याने ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हा ऊसाचे ट्रॅक्टर श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. ऊसाला ३ हजार १०० रुपयांचा भाव मिळावा व त्याचबरोबर पहिली उचल २ हजार ५०० रुपयांची मिळावी यासाठी पंढपूरमध्ये आंदोलन सुरु आहे. त्यात ही घटना घडली. याअगोदर हे गांधींगिरी पध्दतीने सुरु होते. त्यात गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊस दरासाठी एकत्र आल्या आहे. त्यांनी अगोदर मेळावा घेतला. ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित संघटना, जनशक्तीसह या संघटना एकत्र आल्या आहे. या जिल्हयात सहकारी आणि खासगी सर्वच साखर कारखानदार एकत्र येतात आणि ऊसदर ठरवतात. पण, शेतकरी संघटना एकत्र येऊन त्यांनी दराची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही सुरु केले आहे.