नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर तर्फे ऑउटस्टँडिंग पुरस्कारासह अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या अभियंत्यांचा वार्षिक अभियांत्रिकी पुरस्कार सोहळा शुक्रवार दि. २९ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आला असून या वर्षीचा आऊटस्टॅन्डींग इंजिनिअर् पुरस्कार सिएट लिमिटेड, नाशिक चे उपाध्यक्ष (प्लांट ऑपरेशन्स) इंजि. श्रीनिवास एस. पत्की याना देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ,तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम. आर.पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली .
अभियांत्रिकी क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘आऊटस्टॅन्डींग इंजिनिअर पुरस्कार, इंजिनिअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार, युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार तसेच महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संस्थेच्या ह्या पुरस्कारास अभियंत्यांसाठी अत्यंत गौरवास्पद मानण्यात येतो. त्यांनी त्याच दिवशी देण्यात येणारया अन्य पुरस्काराची देखील घोषणा केली.
पुरस्कार असे
इंजिनिअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार – डॉ. जयंत जी. जोशी, विजय एम. खालकर, डॉ. महादेव डी कोकाटे, संग्राम एस लिमये, . सुरेश बी नागरे.
युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार – देवेश सी दीक्षित, एम. ए. हसीब, मयुर एम जैन, अविनाश एस खैरनार, मोहित आय लोखंडे.
महिला अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्कार – पूजा एस पटेल, डॉ. शैलजा ए पाटील, रुपाली एस फुले.
एकलव्य पुरस्कार [गैर अभियांत्रिकी वर्ग ] नेवीन फोली, उपाध्यक्ष (रिसर्च & डेव्हल्पमेंट), अलकॉन इलेक्ट्रॉनिक्स.
या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे. म्हणून महिंद्रा & महिंद्रा लिमिटेड चे वरिष्ट वरिष्ठ उपाध्यक्ष (manufacturing Operations) के. जी. शेणॉय , उपस्थित राहणार असुन या प्रसंगी हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड चे सिईओ डी. मैती यांची देखील प्रमुख उपस्थिती राहील.
इंन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापना सन १९२० साली करण्यात आली असून आजमितीस संस्थेचे २. २ लाखाहुन अधिक कॉरपोरेट व ६. ७ लाखाहुन अधिक नॉन – कॉरपोरेट सदस्य आहेत. संस्थेचे जाळे देशभरात पसरलेले असून त्यात ९२ लोकल सेंटर आहेत तसेच ३२ हुन अधिक स्टेट सेंटर आहेत. नाशिक लोकल सेंटर ची स्थापना सन १९८४ साली करण्यात आली. आज २५०० हुन अधिक कॉरपोरेट मेंबर व सुमारे ९५०० टेक्नीशियन मेंबर नाशिक सेंटरचे सभासद आहेत. नाशिक लोकल सेंटरची सलग्नता धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांशी आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. के. जी. शेणॉय यांनी उत्पादन क्षेत्रात इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि डिजीटल उपक्रम सक्षमपणे चालविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते आज महिंद्रा & महिंद्रा प्लांट्सना “स्मार्ट फॅक्टरी” बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
तसेच डी. मैती यांनी RD-33 इंजिनसाठी असणारी चाचणी रिग्सच्या स्वदेशी विकासासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. BISON अपग्रेड. Su-30MKI विमानाच्या ROH सुविधा स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
या पत्रकार परिषदेस दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर चे अध्यक्ष सुमित खिंवसरा, मानद सचिव . समीर कोठारी, सहसचिव दिपक पंजाबी, धीरज पिचा. विलास पाटिल, महेंद्र कोठारी, मनीष कोठारी, संतोष मुथा, नरेंद्र बिरार, . विपुल मेहता, . महावीर चोपडा, महेंद्र शिरसाठ, वेदांत राठी, . मंगेश गांधी, . संजय देशपांडे, . पंकज जगताप, . गौरव धारकर , अजित पाटील, अंकिता पारख, सहश्ररश्मी पुंड, संकेत आंबेकर, श्रीकांत बच्छाव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते .