मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

by Gautam Sancheti
जून 22, 2025 | 4:58 pm
in राष्ट्रीय
0
CrestEH6T

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन १ जुलै रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंग हे असणार आहेत. या प्रसंगी भारत आणि रशियामधील अनेक उच्चस्तरीय शासकीय व संरक्षण क्षेत्रातील अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. ‘तामाल’ असे नामकरण करण्यात आलेली ही फ्रिगेट, गेल्या दोन दशकांमध्ये रशियाकडून भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या क्रिव्हाक श्रेणीतील आठवी युद्धनौका आहे.

‘तामाल’ ही तुशिल श्रेणीतील दुसरी नौका आहे, जी आधीच्या तलवार आणि तेंग श्रेणीतील नौकांची सुधारित आवृत्ती आहे. तलवार व तेंग या प्रत्येकी तीन-तीन नौकांच्या श्रेण्या होत्या. या व्यापक कराराअंतर्गत, भारतात गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण व रशियन डिझाईन मदतीसह ‘त्रिपुट’ श्रेणीच्या दोन फ्रिगेट्सही बांधल्या जात आहेत. या नौकांच्या मालिकेच्या समाप्तीपर्यंत भारतीय नौदलाकडे एकसमान क्षमतांशी सुसंगत अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकूण दहा युद्धनौका असतील, ज्यात उपकरणे, शस्त्रास्त्र व सेन्सर प्रणालींची समानता असेल.

तामाल’च्या बांधकामावर भारतीय युद्धनौका देखरेख पथकातील तज्ञांच्या पथकाने निरीक्षण केलं असून, हे पथक भारतीय दूतावास, मॉस्कोच्या अधिपत्याखाली कॅलिनिनग्राड येथे कार्यरत होते. नौदल मुख्यालयात, युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रकांच्या अंतर्गत जहाज उत्पादन संचालनालयाने या प्रकल्पाचे नेतृत्व केले.

‘तामाल’ची निर्मिती रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यांतर शिपयार्डमध्ये करण्यात आली असून, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अनुषंगाने परदेशातून प्राप्त होणारी ही शेवटची युद्धनौका ठरणार आहे. या जहाजामध्ये २६ टक्के स्वदेशी घटकांचा समावेश आहे, ज्यात समुद्रावर व जमिनीवर लक्ष्यभेद करणारे ब्रह्मोस लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्रही आहे. या जहाजात आपल्या पूर्ववर्तीशी तुलना करता लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून, उभ्या प्रक्षेपण पद्धतीच्या (VLS) पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली, सुधारित १०० मिमी तोफ, सुधारित इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड प्रणाली, 30 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टम (CIWS), जड टॉरपीडोज, त्वरित हल्ला-विरोधी पाणबुडी रॉकेट्स आणि अनेक पाळत ठेवणाकी आणि अग्नि नियंत्रण रडार प्रणाली यांचा समावेश आहे. लढाऊ क्षमतांमध्ये वृद्धी साधण्यासाठी, हवाई प्रारंभिक इशारा व बहुउद्देशीय भूमिका पार पाडणारी हेलिकॉप्टर्स या जहाजावरून तैनात करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तामाल’च्या लढाऊ क्षमतेमध्ये नेटवर्क-सेंट्रिक युद्ध प्रणाली आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींचा अंतर्भाव आहे.. अधिक वजन आणि अधिक मारक क्षमतेच्या गुणोत्तरासह, दीर्घकालीन गस्त क्षमतेसह आणि 30 नॉट्सहून अधिक गती क्षमतेसह ‘तामाल’ आपले सामर्थ्य सिध्द करते.

या नौकेवरील सुमारे २५० नौसैनिकांनी सेंट पीटर्सबर्ग व कॅलिनिनग्राड येथील अत्यंत कठीण हिवाळी परिस्थितीत जमिनीवर व समुद्रावर कठोर प्रशिक्षण घेतले आहे. ‘तामाल’ने तीन महिन्यांच्या कालावधीत विस्तृत समुद्री चाचण्या पूर्ण केल्या असून, त्याच्या सर्व प्रणाली, शस्त्रास्त्रे व सेन्सर्स कार्यक्षम असल्याचे सिध्द झाले आहे.

या युद्धनौकेचे नाव ‘तामाल’ हे देवांचा राजा इंद्र याने युद्धासाठी वापरलेल्या पौराणिक तलवारीचे प्रतीक आहे. जहाजाचे शुभचिन्ह ‘जांबवंत’ – भारतीय पुराणकथांतील अजरामर अस्वल राजा – आणि रशियाच्या राष्ट्रीय प्राणी असलेल्या युरेशियन ब्राऊन बेअर यांच्यातील मिश्रणावर आधारित आहे. या जहाजाचे नौसैनिक स्वतःला ‘द ग्रेट बेअर्स’ म्हणून गौरवाने संबोधतात. ‘तामाल’ भारत-रशिया मैत्रीच्या दृढ संबंधांचे प्रतीक असून, ही मैत्री कालाच्या कसोटीतही सिद्ध झाली आहे. या जहाजाचे घोषवाक्य ‘सर्वदा सर्वत्र विजय’ हे भारतीय नौदलाच्या प्रत्येक मोहिमेतील उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. हे घोषवाक्य भारतीय नौदलाच्या ‘लढाईसाठी सज्ज, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यासाठी सज्ज दल राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण करते – कधीही, कुठेही’ या त्याच्या ब्रीदवाक्याला पूरक आहे.

१२५ मीटर लांब आणि ३९०० टन वजनाची ही युद्धनौका अत्याधुनिक भारतीय व रशियन तंत्रज्ञानाचा उत्तम संगम असून, युद्धनौका बांधणीतील उत्कृष्ट पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे. या जहाजाच्या नवीन डिझाइनमुळे त्यात सुधारीत गुप्त वैशिष्ट्ये आणि अधिक स्थिरता प्राप्त झाली आहे. भारतीय नौदलाच्या तज्ज्ञ व रशियाच्या सेव्हर्नॉय डिझाईन ब्युरो यांच्या सहकार्याने स्वदेशी घटकांचा वाटा २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असून, स्वदेशी बनावटीच्या प्रणालींची संख्या आता ३३ पर्यंत वाढली आहे. ‘तामाल’मध्ये युद्धासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये जहाजविरोधी आणि जमिनीवर हल्ला करण्याच्या क्षमतेसाठी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली, पृष्ठभाग देखरेख रडार कॉम्प्लेक्स, HUMSA-NG Mk II सोनार व पाणबुडीविरोधी शस्त्र प्रक्षेपण प्रणाली यांसह अनेक स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व सेन्सर बसविण्यात आले आहेत. याशिवाय, आधुनिक संवाद व डेटा लिंक प्रणाली, नेव्हिगेशन उपकरणे व महत्त्वाची पायाभूत सुविधा समाविष्ट आहे, ज्यामुळे हे जहाज भारतीय नौदलाच्या संचालनात्मक क्षमतेत महत्त्वाची भर घालते. या प्रकल्पात सहभागी असलेल्या प्रमुख भारतीय कंपन्यांमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, केल्ट्रॉन, टाटा समूहातील नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टिम्स, एल्कोम मरीन, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया यांचा समावेश आहे.

‘तामाल’ सेवेत आल्यानंतर भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड अंतर्गत ‘स्वॉर्ड आर्म’ अर्थात पश्चिम ताफ्यात दाखल होईल. ही नौका केवळ भारतीय नौदलाच्या क्षमतांचा विस्तार दर्शविणारी ठरणार नाही, तर भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य आणि भागीदारीचेही उदाहरण ठरेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

Next Post

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011