नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार देशात जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा सर्वसाधारण सरासरीएवढा म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमानाच्या (LPA) ९६ ते १०४ टक्के होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे.
-
जून ते सप्टेंबर दरम्यान देशात पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा यावर्षी पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या १०१ टक्के एवढा होईल.
-
या अंदाजात ४ टक्के अधिक उणे. एवढी त्रुटी असू शकेल. १९६१-२०१० या मोठ्या कालखंडात देशातील नैऋत्य मोसमी पावसाची सरासरी ८८ से. मी. होती. देशातील चार एकसंध भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण असेल.
-
वायव्य भारतात ९२ ते १०८ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात ९३ टक्के ते १०७ टक्के. मोसमी पावसाचे ईशान्य भारतातील प्रमाण सरासरीहून कमी म्हणजेच ९५ टक्के हून कमी तर मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्केहून जास्त असेल असा अंदाज आहे.
-
मुख्यत्वे मोसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या आणि मोसमी पावसावर आधारित शेती असणाऱ्या भागात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीहून जास्त म्हणजे सरासरीच्या १०६ टक्के होईल.
-
मोसमी पाऊस सर्वसाधारणपणे सर्वदूर व्यवस्थित पडेल. या मोसमात देशातील बहुतेक भागात सरासरीएवढा किंवा त्याहून जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे.
-
आधुनिक जागतिक हवामान प्रतिकृतीनुसार केल्या जाणाऱ्या हवामान अंदाजावरून विषुववृत्तीय पॅसिफिक समुद्रात एल निनो तसेच दक्षिण दोलन परिस्थिती आहे तशीच राहिल्याने हिंदी महासागरातील IOD म्हणजेच हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान दोलनात नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.