अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवल्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी चक्क मातीच्या विटेवरच जलरंगात विठू रायाचे चित्र रेखाटले आहे. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या घराजवळ एक बांधकाम चालू असून तिथे काही विटा पडलेल्या होत्या. त्यांनी विटाकडे पाहिलं व त्यांना कल्पना सुचली की आपण या विटेवर जो विठुराया विटेवरी उभा आहे. त्याची प्रतिमा विटेवर साकरावी त्यांनी जल रंगांचा उपयोग करत या विटेवर अप्रतिम अशी विठुरायाची प्रतिमा साकारली.