नवी दिल्ली – देशात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच एक कंपनी म्हणजे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अखत्यारीतील हैदराबाद येथील ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’, असून तिला केंद्र सरकार औषधनिर्मितीसाठी अर्थसहाय्य करणार आहे.
या संदर्भात भारत बायोटेक आणि आयआयएल यांच्यात कोव्हॅक्सीन लसीसाठी आवश्यक औषध निर्मितीबाबत तांत्रिक सहकार्य करार झाला आहे. इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड कंपनी, पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपासून, लसीसाठी आवश्यक औषधाचे उत्पादन सुरु करणार असून, जुलै महिन्यात भारत बायोटेकला औषधाची पहिली खेप पाठवली जाईल, अशी माहिती, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक, डॉ के आनंद कुमार यांनी दिली.
इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’दर महिन्याला सुमारे १०-१५ दशलक्ष लसींसाठी लागेल एवढा औषध पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे, सांगत, सुरुवातीला,२-३ दशलक्ष मात्रांसाठी असेल आणि नंतर हे उत्पादन दर महिना ६-७ दशलक्ष पर्यंत उत्पादन वाढवले जाईल, असे ते म्हणाले.
आयआयएल, आणखी एका कोविड लसीसाठी काम करत असून त्याच्या प्राण्यांवरच्या चाचण्या सुरु आहेत. मानवासाठीची लस पुढच्यावर्षी पर्यंत येणे अपेक्षित आहे, असे डॉ कुमार यांनी सांगितले. आपली औषधक्षमता वाढवण्यासाठी इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला ६० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.