नाशिक – गांधीनगर परिसरात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या होर्डिंगला शिवसैनिकांनी काळे फासून त्यावर गद्दार असे लिहल्यामुळे या परिसरात खळबळ निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सम्राट चौक या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय आघाडी चे नेते व एकनाथ शिंदे समर्थक योगेश म्हस्के व सुजित जिरापुरे यांनी मोठे होर्डिंग लावले होते. याच होर्डींगवर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात शिवसैनिकांनी होर्डिंगला काळे फासले. त्यानंतर हे शिवसैनिक फरार झाले. या परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या काही दिवसाापासून शिवसेनेतील बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात जिल्हयातील शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटात दाखल झाले आहे. पण, नाशिमध्ये शिंदे समर्थंनाचा कोणी दावा केला नव्हता. पण, गांधीनगर येथे पोस्टर झळकल्यामुळे नाशिकमध्येही शिंदे समर्थक आता पुढे येत आहे.