इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये एका डॅाक्टरला तरुणीने सेक्सटॅार्शनमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या तब्येत बिघडली असून घरी बोलावून थेट जाळ्यात अडकवले. या प्रकाराचा डॅाक्टरला मोठा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रिया गंगावार या तरुणीसह तिला मदत करणारी एक महिला व दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या तरुणीने डॅाक्टरकडे अगोदर नोकरी मागितली. मात्र डॅाक्टराने त्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणीने पुन्हा पाठपुरावा केला. पण, नोकरी मिळाली नाही. त्यानंतर या तरुणीने आईची तब्येत खराब असल्याचे सांगत डॅाक्टरांना घरी बोलावले. डॅाक्टर घरी गेल्यानंतर ही तरुणी विवस्त्र होती. त्यानंतर या तरुणीने डॅाक्टारांबरोबर अश्लिल चाळे केले. यावेळी अगोदरच असलेल्या एका महिलेने व दोन तरुणांनी डॅाक्टरांचे कपडे काढले. त्यानंतर दोघांचे आक्षेपार्ह असे व्हिडिओ बनवले.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर तरुणीने ब्लॅकमेल करणे डॅाक्टरला सुरु केले. अगोदर ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर एक लाख रुपये घेतले. वारंवार वेगवेगळ्या नंबरने फोन करुन ही तरुणी डॅाक्टरांना ब्लॅकमेल करत असल्यामुळे त्याचा धसका डॅाक्टरांनी घेतला व त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकरणात या सर्व गॅंगला पोलिसांनी गजाआड केले. डॅाक्टरांना फसवण्याअगोदर या तरुणीने आठ जणांना असे फसवून सहा रुपयाला गंडा घातल्याचाही प्रकार समोर आला आहे.