अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पाण्याच्या शोधात शेततळ्यात पडलेला कोल्ह्याला जीवदान दिल्याची घटना येवला तालुक्यातील सायगाव येथे घडली. सायगाव येथील शेतकरी गणपत खैरनार यांच्या शेततळ्यामध्ये कोल्हा पडला असल्याचे विजय खैरनार यांना दिसताच त्यांनी आपला मुलगा मयूर खैरनार व भाऊ गणपत खैरनार यांना बोलवुन घेतले. त्यानंतर या सर्वांनी कोल्ह्याला शेततळ्यातून बाहेर पडता येत नसल्याचे बघताच या शेतकऱ्यांनी शेततळ्यात शेडनेट सोडले. या शेडनेरच्या आधार घेत कोल्हा बाहेर आला काही वेळ त्याला वर येताना अडचणी आल्या मात्र नंतर तो पुन्हा नेटच्या बाजूने वर चढला आणि त्याने शेतात धूम ठोकली.