बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

by India Darpan
जून 18, 2025 | 6:23 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250617 WA0334 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिंहस्थ कुंभमेळा आयोजनामध्ये सर्व विभागांची महत्वाची भूमिका आहे. संबंधित विभागांनी या सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाला परिपूर्णता आणण्यासाठी त्यातील प्रस्तावामधील बाबी पुन्हा तपासाव्यात आणि ते अचूक होतील याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.

नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत व नाशिक विभागातील इतर क्षेत्रामध्ये होणाऱ्या कुंभमेळा व संलग्न उपक्रमांचे आयोजन व व्यवस्थापना साठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी झाला. या प्राधिकरणाची पहिली बैठक मंगळवारी विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष तथा मनपा उपायुक्त करिश्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक आरोग्य , रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, लेखा व कोषागारे, महावितरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, डॉ. गेडाम म्हणाले की, ही प्राधिकरणाची पहिलीच बैठक आहे. या अनुषंगाने सर्व विभागांची एकत्रित बैठक ही नियोजनाच्या दृष्टीने महत्वाची आहे. सर्व विभागाने या सोहळा कालावधीत करावयाच्या कामांचे नियोजन तयार केले आहे. त्यात अधिक अचूकता येण्यासाठी त्यातील महत्वाच्या बाबीवर आता अधिक व्यापक प्रमाणात लक्ष देणे आवश्यक आहे.

कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय लवकरच
कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय सुरू करण्याबाबत आणि त्यासाठी जागेची निवड करण्याबाबत डॉ. गेडाम यांनी उपायुक्त करिश्मा नायर यांना सांगितले. मध्यवर्ती ठिकाणी असणारे, समन्वय आणि नियोजनासाठी सर्वांना सुलभ असेल अशी जागा निवडावी, असे त्यांनी सांगितले.

कुंभमेळा कक्ष अधिक व्यापक होणार
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या कामातील सुसूत्रतेसाठी यापूर्वीच कुंभमेळा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तो अधिक विस्तृत आणि व्यापक करून नियोजन आणि अंमलबजावणी, गुणवत्ता नियोजन आणि समन्वय या बाबीकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

Next Post

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

Next Post
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011