गोमा : आफ्रिकन खंडाच्या मध्यभागी असलेल्या कॉंगो देशातील गोमा शहराजवळील विरुंगा डोंगरावर १९ वर्षांनंतर अचानक निरागंगा ज्वालामुखीचे पुनरुत्थान झाले. जगातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय ज्वालामुखींमध्ये याची गणना केली जाते. या दुर्घटनेत पाच ठार झाले, तर ५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहे.
स्थानिक प्रशासनाने इशारा दिल्याबरोबर शहरातील हजारो लोक जीवनावश्यक वस्तू घेऊन रवांडाला जायला लागले. पळापळी दरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लावामुळे ५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. गोमाची लोकसंख्या २ कोटी आहे, यापुर्वी २००२ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटात २५० लोक ठार झाले होते. तर आता एक लाख वीस हजाराहून अधिक लोक बेघर झाले.
रवांडा प्रशासनाने निर्वासनाची सांगितले की, जवळपास साडेतीन हजार लोक रवांडामध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांना प्रार्थनास्थळांमध्ये आणि शाळांमध्ये सामावून घेण्यात येत आहे. ज्वालामुखीचा लाव्हा महामार्गावर पोहोचला आहे. ज्वालामुखी तज्ज्ञ डारिओ डेत्स्को यांनी म्हटले आहे की, ज्वालामुखीचा लाव्हा गोमाकडे वाहत असून तो १९ वर्षांपूर्वी इतकाच धोकादायक आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष फेलिक्स त्सेडेकी हे आता मध्य युरोपमधील दौरा सोडून देशाकडे परतत आहेत. तर पंतप्रधान जीन मिशेल समा लूकोंडे यांनी आपत्कालीन बैठक बोलविली आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेचा एक भाग म्हणून, मध्य अफ्रिकी देशातील गोमा शहराजवळ ज्वालामुखी फुटल्यानंतर भारतीय सैन्याच्या तुकडीने स्थानिक नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण केले आहे.